खारघरमध्ये उभारणार आफ्रिका-भारत व्यापार केंद्र

भारत-आफ्रिका संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार

    14-May-2026
Total Views |
CIDCO–Africa India Economic Foundation Agreement
 
मुंबई : (CIDCO–Africa India Economic Foundation Agreement) भारत-आफ्रिका संबंध दृढ करण्यासाठी सिडको व एआयईएफ यांच्या दरम्यान आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र विकसित करण्यासाठी विशेष वाहन हेतू कंपनी स्थापन करण्याकरिता करार करण्यात आला.
 
सिडको आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन यांच्यात गुरुवार, दि. 14 मे रोजी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र विकसित करण्याकरिता करारावर स्वाक्षऱ्या करून आदान-प्रदान करण्यात आले.
 
सिडकोतर्फे आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) नवी मुंबई येथे प्रस्तावित असून भारत व आफ्रिकन राष्ट्रांमधील आर्थिक, व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे एकात्मिक केंद्र म्हणून हा प्रकल्प संकल्पित आहे. भारत-आफ्रिकेतील सध्याच्या 96 अब्ज अमेरिकन डॉलर भागीदारीच्या क्षमता अधिक वाढीस लागाव्या याकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. (CIDCO–Africa India Economic Foundation Agreement)
 
याप्रसंगी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले, आफ्रिका भारत व्यापार केंद्र या धोरणात्मक प्रकल्पाद्वारे भारत-आफ्रिका संबंधांना चालना मिळणार आहे. कल्पना, नवोपक्रम आणि मानवी भांडवल यांचे एकात्मिकरण करून एआयबीसी हे परस्पर वाढीकरिता पूरक परिसंस्था निर्माण करेल. ग्लोबल साऊथचे प्रवेशाद्वारे म्हणून महाराष्ट्र एआयबीसी मार्फत आफ्रिकेच्या विकासातील विश्वसनीय भागीदार म्हणून भारताचे स्थान नव्याने अधोरेखित करण्यासह भविष्यातील भागीदारी आणि संधी साकार करेल. (CIDCO–Africa India Economic Foundation Agreement)
 
 
सेंट्रल बिझनेस टॉवर: 54 आफ्रिकन राष्ट्रे आणि भारतीय भागधारकांसाठी कार्यालये
कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर: 5,000-6,000 क्षमता असलेले सभागृह
हॉस्पिटॅलिटी आणि हॅबिटॅट ब्लॉक: हॉटेल्स आणि सर्व्हिस्ड अपार्टमेंट्स
सांस्कृतिक आणि रिटेल हब
आफ्रिका-इंडिया बायो डोम
 
आफ्रिका भारत व्यापार केंद्र हा परिवर्तन घडवून आणणारा प्रकल्प असून याद्वारे भारत-आफ्रिका संबंधांचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्र उदयास येणार आहे. जागतिक पटलावर महाराष्ट्राला मानाचे स्थान प्राप्त होण्यासह ग्लोबल साउथमधील भारताच्या विस्तारणाऱ्या भूमिकेकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे.
- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
 
खारघर येथील प्रस्तावित आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र हे जागतिक व्यापार संबंधांना सहाय्यभूत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याकरिता महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराकरिता पसंतीचे ठिकाण म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक उंचावणार आहे.
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
 
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता संधी तसेच रोजगार निर्मिती आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करून आफ्रिका भारत व्यापार केंद्र हे आर्थिक प्रगतीकरिता प्रेरक ठरेल. भारत व आफ्रिकन देशांदरम्यान शाश्वत संबंध प्रस्थापित करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देत, दीर्घकालीन भागीदारीला प्रोत्साहन मिळून मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देईल. (CIDCO–Africa India Economic Foundation Agreement)
- सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री