महाराष्ट्रातील मतदार याद्यांचं होणार विशेष सखोल पुनरिक्षण, निवडणूक आयोगाकडून SIRच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा
14-May-2026
Total Views |
नवी दिल्ली : (Election Commission Voter List) केंद्रीय निवडणूक आयोगानं गुरुवारी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तंलगणा, ओडिशा, पंजाब, दिल्लीसह १६ राज्यांचा आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. मतदार याद्यांच्या या पुनरिक्षणासाठी देशात सुमारे ३.९४ लाख बूथ पातळीवरील अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.
या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्ष बूथ पातळीवर ३.४२ लाख कार्यकर्ते देणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत सुरु असलेल्या या पुनरिक्षणात ३६.७३ कोटी मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे.(Election Commission Voter List)