१२०० पानी दोषारोप पत्र, ११ प्रकरणांचा तपास, १०५हून अधिक साक्षी! खरात प्रकरणात नेमकं काय घडतंय?
भोंदूबाबा खरातविरोधात १२०० पानी दोषारोपपत्र दाखल
14-May-2026
Total Views |
नाशिक : (Ashok Kharat Case) अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात २ गुन्ह्यांमध्ये १२०० पानांचं दोषारोपपत्र नाशिक न्यायालयात एसआयटीनं दाखल केलंय. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खरातविरोधात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ११ प्रकरणांचा तपास एसआयटीकडून करण्यात येतोय.
६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणं आवश्यक असल्यामुळे १७ मार्चला दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यासह दोन प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाचा तपास सुरुच असून, इतर पुरावे पुरवणी दोषारोपपत्रात जोडण्यात येतील, अशी माहिती एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिलीय. (Ashok Kharat Case)
अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा, सावकारी असे गुन्हे दाखल आहेत. एसआयटीकडे यातील प्रामुख्याने लैंगिक अत्याचार प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास आहे.
एसआयटीनं आत्तापर्यंत 105 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. फलज्योतिषी असल्याचं भासवून अशोक खरातनं विविध रत्नं, पूजाविधीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याचं यातून स्पष्ट झालेलं आहे. साक्षी, कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक्स पुरावे एकत्र करुन ते दोषारोपपत्रात जोडण्यात आले आहेत.(Ashok Kharat Case)