मुंबई : (Ahilyanagar Travel Jihad Case) अहिल्यानगर-पुणे शिवशाही बसमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा आणि समाजात फोफावत असलेल्या एका नव्या विकृत प्रवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर आणला. ‘ट्रॅव्हल जिहाद’ नावाचे एक नवीन संकट हिंदू महिलांसमोर उभे राहात असल्याचे चित्र दिसत आहे.(Ahilyanagar Travel Jihad Case)
अहिल्यानगरमध्ये एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका हिंदू महिला प्रवाशासोबत जिहादी कंडटर नूर पटेल याने अश्लील कृत्य केल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले. त्यानंतर अहिल्यानगर परिसरात संतापाची लाट उसळली. ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. अहिल्यानगरच्या कायनेटिक चौकात ‘रास्ता रोको’ करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आ. संग्राम जगताप हेदेखील आक्रमकतेने यात सहभागी झाल्याचे दिसले.(Ahilyanagar Travel Jihad Case)
सोमवारी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्याने केवळ अहिल्यानगरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. यात कंडटर नूर पटेल बसमध्ये शेवटच्या सीटवर बसून एका महिलेसोबत अश्लील वर्तन करताना दिसत आहे. सदर प्रकरण बाहेर आल्यानंतर ‘सकल हिंदू समाजा’त संतापाची लाट उसळली. सदर घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. त्यानंतर अहिल्यानगरच्या कायनेटिक चौकात ‘रास्ता रोको’ करत आंदोलन करण्यात आले.(Ahilyanagar Travel Jihad Case)
आ. संग्राम जगताप यांनीसुद्धा यावेळी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसले. जोवर संबंधित मुजोर कंडटरवर गुन्हा दाखल होत नाही आणि तशी अधिकृत प्रत मिळत नाही, तोवर जागेवरून न हलण्याचा ठाम पवित्रा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. "महिलांनी प्रवास करताना चालक-वाहक कोण आहेत, याची खात्री करणे, ही काळाची गरज बनली आहे. अशा प्रकारच्या जिहादी वृत्तीला वेळेतच लगाम घालण्यासाठी सर्वांनी जात-पात आणि अंतर्गत मतभेद विसरून एकजूट दाखवली पाहिजे. हिंदू समाज हा संघटित झाला, तरच अशा समाजकंटकांना चोख उत्तर मिळेल,” असे ते म्हणाले.(Ahilyanagar Travel Jihad Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक