हिजाब कसा घालायचा? कलमा पठण कसे कराल? टीसीएस कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन शिकवायची निदा खान! इस्लाम स्वीकारावा म्हणून पाठवले १७१ व्हिडिओ : फक्त हिंदू कर्मचारी होते टार्गेटवर
नाशिक (TCS Corporate Jihad Case) : नाशिक कॉर्पोरेट जिहादमधील प्रमुख आरोपी निदा खानच्या चौकशीत आता धक्कादायक खुलासे येऊ लागले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने ५० पानी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला आहे. दुसरीकडे एसआयटीचा तपास प्रकर्षाने सुरू आहे. आता निदा खानने पीडितांना पाठवलेले १७१ व्हिडिओ अधिकाऱ्यांना सापडले आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रार्थमिक तथ्य अहवालातील नोंदीनुसार १८ आणि १९ एप्रिल रोजी पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि टीसीएसची एक समितीने याबद्दल चर्चा केली. यात काही अन्य साक्षीदारांकडून माहिती घेण्यात आली. या अहवालात टीसीएसमध्ये सुरू असलेल्या मानसिक त्रास, लैंगिक छळ, पदाचा दुरुपयोग, हिंदुविरोधी वातावरणाची निर्मीती याचा उल्लेख चर्चेत झाला. समाजात होणारी बदनामी, त्रास यामुळे काही पीडित तक्रार नोंदविण्यास धजावत नव्हत्या.
TCS NASHIK JIHAD CASE UPDATE🚨
Nida Khan, an employee of TCS Nashik, anticipatory bail application, citing her two-month-old pregnancy.😳
तपासात पॉश कायद्याचे पालन करण्यात कंपनी कुचराई करत असल्याचे निदर्शनास आले. नाशिक आणि पुण्यातील कार्यालयांची मिळून एकच पॉश समिती गठीत करण्यात आली आहे. मुळात हाच पॉश कायद्याचा भंग मानला गेला. आयोगाने तक्रारदारांच्या सुरक्षेसह आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार कारवाई करण्याच्या २५ शिफारशी या अहवालात केल्या आहेत.
— United News of India (@uniindianews) May 11, 2026
निदा खानचे कारनामे उघड
एसआयटीने मुख्य आरोपी निदा खानच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. पोलीसांनी तिचे पासबूक जप्त केले आहे. कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे तिला मदत तर केली जात नाही ना? अशी चौकशी आता पोलीस करत आहेत. फरार होण्यासाठी निदा खान कुठल्या लोकांशी संपर्क करत होती याचाही छडा आता लावण्यात येणार आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान आरोपींच्या घरी जात असे. तिथे हिजाब घालण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. नमाज पठण, कलमा पठण आदी गोष्टी ती पीडितांना शिकवत असे. तिने इस्लामचे शिकवण देणारे १७१ व्हिडिओ पीडितांना पाठवले होते.
Bulldozer action on the house & office of AIMIM corporator Matin Patel.. 🔥
He gave Nida Khan, the main accused in the TCS conversion racket case, a place to hide. pic.twitter.com/sdGc8t3Np9
निदा खान ताब्यात आल्यानंतर न्यायालयाने तिचा जामीन नाकारला आहे. निदा खान स्वतः गर्भवती असल्याचा दावा करत आहे. मात्र, पोलीसांना तिने ४५ दिवस गुंगारा दिल्याने तिच्या या जामीनाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार नसल्याचे आता स्पष्ट आहे. ज्या ठिकाणी निदा २५ दिवस लपली होती, त्या एमआयएम नगरसेवकाच्या घरावर आता बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या प्रकरणात आता एमआयएमचे नेते पुढे येऊन नगरसेवक पटेल याची पाठराखण करत आहेत. मात्र, हे घर बेकायदा असल्यानेच त्याच्यावर कारवाई केली असल्याचा खुलासा महापालिकेने दिला आहे.
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.