२०२९ला रोहित पवार यांचा बारामतीत काँग्रेस पक्षाकडून उभे राहण्याचा आत्तापासून प्लँन - सुनिल शेळके

    13-May-2026
Total Views |
ROHIT PAWAR
 
मुंबई : (Sunil Shelke Speaks about Rohit Pawar) "रोहित पवार सातत्याने जनतेसमोर खोट बोलायचा प्रयत्न करत आहेत.स्वताला प्रसिध्दी मिळावी यासाठी ते सातत्याने वेगवेगळी विधान करत असतात.रोहित पवार यांनी बारामती पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्याचा जो काही हट्ट धरला होता हे आता आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगितले पाहिजे का?
 
२०२९ ला रोहित पवार बारामतीत काँग्रेस पक्षाकडून उभे राहण्याचा आत्तापासून प्लँन करत आहेत. हे आम्हाला माहित आहे पण आम्ही आजपर्यंत कधी बोलून दाखवत नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्थिरता आणण्याचा रोहित पवार जो प्रयत्न करत आहेत. त्याला पक्षाचा एकही कार्यकर्ता थारा देणार नाही."असे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांनी बुधवार दि. १३ रोजी केले आहे.
 
हेही वाचा :  सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ; शासन निर्णय जारी
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले की,"राष्ट्रवादीत काही धूसफूस नाही.सर्वजण अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात एकसंघपणे काम करत आहेत.दादांच्या अपघातापासून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष कसा फुटेल,कसा बदनाम होईल यासाठी रोहित पवार एजन्सी लावून काम करत आहेत."
 
"रोहित पवार काय म्हणतात यावर भाजपच किंवा महाराष्ट्राच राजकारण चालत नाही.रोहित पवारांना दुसरा संजय राऊत म्हटल तर वावग ठरणार नाही. रोहित पवार यांच स्वताच मंत्रीपदाच स्वप्न भंग झाल्यामुळे २२ आमदार जाणार असे तर्क वितर्क रोहित पवार लावत आहेत."अशी प्रतिक्रीया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. (Sunil Shelke Speaks about Rohit Pawar)