प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला भुयारी मेट्रोने प्रवास
13-May-2026
Total Views |
मुंबई : (Ramdas Athawale traveled by underground Metro) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पेट्रोल डिझेल वाचविण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुंबईत विधानभवन ते धारावी पर्यंत भुयारी मेट्रोने प्रवाद केला.खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक सेवेचा बस; रेल्वे आणि मेट्रो चा वापर करून इंधन वाचविण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले.यापुढे शक्य होईल तेंव्हा आपण मेट्रोने प्रवास करणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
यावेळी ना. रामदास आठवले यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई मायनॉरिटी अध्यक्ष सोहेल शेख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारताची अर्थव्यवस्था विश्वात चौथ्या क्रमांकाची आहे.भविष्यात भारताची अर्थव्यवस्था कमजोर होऊ नये यासाठी आताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काही काटकसरीचे इंधन बचतीचे उपाय सांगितले असून त्यानुसार देशवासीयांनी इंधन बचत करावी .त्यासाठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणे द्वारे प्रवास करावा .मुंबई आणि मेट्रो शहरांतील नागरिकांनी मेट्रोचा वापर करावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. (Ramdas Athawale traveled by underground Metro)
आज दुपारी 12 वाजता ना. रामदास आठवले यांनी विधानभवन भुयारी मेट्रो रेल्वे स्टेशन येथे तिकीट काढून धारावी पर्यंत भुयारी मेट्रोने प्रवास केला.यापुढे नेहमी मेट्रो ने प्रवास करण्याचा आपला प्रयत्न असेल असे ना. रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale traveled by underground Metro)