मुंबई : (Government Employees) राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यामुळे वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
केंद्र सरकारने १ जानेवारी २०२६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५८ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. महाराष्ट्र राज्य संवंर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दि. १ जानेवारी २०२६ पासून ही सुधारित दरवाढ लागू होणार आहे. (Government Employees)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....