बारामती येथे विमानाचे आपत्कालीन लँडिंग;लँडिंग करताना प्रशिक्षण विमान कोसळले

Total Views |
 Emergency Landing
 
बारामती : (Emergency Landing) रेडबर्ड कंपनीचे एक प्रशिक्षण विमान बुधवारी सकाळी प्रशिक्षण सत्रादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बारामती येथे आपत्कालीन उतरवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ८:४० च्या सुमारास गोजुबावी गावाजवळ प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या (पायलट) विमानाला अडचण आली.
 
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल म्हणाले, “आज सकाळी सुमारे ८:५० वाजता, रेड बर्ड एव्हिएशनचे एक प्रशिक्षण विमान बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावाजवळ कोसळले (क्रॅश लँडिंग झाले). घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कमी उंचीवरून उडत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला होता.
 
हेही वाचा :  मुंबई पोर्ट ट्रस्टकडून झोपडपट्ट्यांवरील तोडक कारवाई थांबवावी;मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
 
क्रॅश लँडिंग दरम्यान, विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी त्याचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला. विमानामध्ये फक्त एकच प्रशिक्षणार्थी पायलट होता. सुदैवाने, पायलटला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आवश्यक चौकशी आणि पुढील कारवाई सुरू आहे. अधिक तपशील मिळाल्यानंतर सामायिक केले जातील.”(Emergency Landing)
 
पायलटने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले
 
विमान हवेत असतानाच समस्या निर्माण झाली असूनही, प्रशिक्षणार्थी पायलटने शेजारील एका उसाच्या शेतात विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. या आपत्कालीन लँडिंगमुळे मोठा अपघात टळला आणि जमिनीवर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.(Emergency Landing)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.