अमुल दुधाच्या दरात वाढ!जाणून घ्या नवे दर! कधीपासून लागू?
13-May-2026
Total Views |
अहमदाबाद : (Amul Milk Rate Increase) अमूल दुधाच्या दरात प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
इंधनाच्या काटकसरीचा वापर करण्यास सांगितल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी इंधन दर वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दूधपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि संभाव्य वाहतूक खर्चात होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) अर्थात अमूलने विविध दूध उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ जाहीर केली आहे.यामध्ये १ लिटर अमूल ताजा दुधाच्या दरात २ रुपयांची, तर ५०० मिली अमूल गोल्ड दुधाच्या दरात १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर १५ मेपासून लागू होणार आहेत. (Amul Milk Rate Increase)