राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत नवीन कायदा आणणार;मसूदा प्रसिद्ध; ५ जूनपर्यंत मागवल्या हरकती आणि सूचना

    12-May-2026   
Total Views |
Temple Land Ownership Maharashtra
 
मुंबई : (Temple Land Ownership Maharashtra) राज्यातील धार्मिक किंवा धर्मादाय संस्थेकडे असलेली इनामे नाहीसे करण्यासाठी आणि पुजारी, वहिवाटदार आणि मिरासदार यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम’ आणण्याच्या तयारीत आहे. यावर राज्यातील विविध देवस्थानांच्या नावावर असलेल्या सुमारे साडेचार लाख हेक्टरहून अधिक जमिनींचा मालकी हक्क आता त्या जमिनी पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या पुजारी, वहिवाटदार आणि मिरासदार यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
संपूर्ण राज्यभरात हा अधिनियम लागू असेल. मात्र, हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम आणि वक्फ अधिनियम यांच्या व्याप्तीखाली येणाऱ्या जमिनींना हा अधिनियम लागू राहणार नाही. महसुल विभागाने या कायद्याच्या प्रारुपावर येत्या ५ जूनपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत.
 
या कायद्यानुसार धर्मादाय संस्थांकडे असलेली इनामे खालसा करण्यात येतील. त्यानंतर संबंधित जमिनी पुजारी, वहिवाटदार किंवा मिरासदार यांच्या कायमस्वरूपी मालकीच्या केल्या जाणार आहेत. जमिनीचे हस्तांतरण करताना संबंधितांकडून रेडीरेकनर दरानुसार मूल्य आकारले जाणार असून ही रक्कम संबंधित देवस्थान संस्थेला दिली जाणार आहे. तसेच या जमिनींचे हस्तांतरण करताना वहिवाटदारांना भोगवटादार वर्ग-१ म्हणून दर्जा दिला जाईल. (Temple Land Ownership Maharashtra)
 
हेही वाचा :  नीट पेपरफुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन उघड, बीएएमएसच्या विद्यार्थाला अटक, नाशकातून पेपर देशभरात
 
कमाल जमीन धारण कायद्यानुसार, एखाद्या वहिवाटदाराकडे निश्चित मर्यादेपेक्षा अधिक जमीन असल्यास अतिरिक्त जमीन सरकार आपल्या ताब्यात घेईल. तसेच या प्रस्तावित कायद्यानुसार, देवस्थान जमिनींवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांकडून त्या जमिनी काढून घेण्यात येतील. मात्र, १ जानेवारी २०११ पूर्वी झालेले अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर दंड आकारून नियमित करण्याचे देण्यात आले आहेत. (Temple Land Ownership Maharashtra)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....