मध्यस्ताची भूमिका निभावणाऱ्या पाकिस्तानने दिला अमेरिकेविरुद्ध इराणच्या लढाऊ विमानांना आसरा! वाहनतळाद्वारे अमेरिकन हल्ले रोखण्याचा झाला प्रयत्न
12-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन : आपल्याच मित्राच्या पाठीत खंजीर कसा खुपसायचा, हे पाकिस्तानला कुणी शिकवायची गरज नाही. मीडिया रिपोर्टनुसार, काही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीच एक महत्वाचा खुलासा केला आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या वेळी पाकिस्तानने गुप्तपणे महत्वाचे लष्करी विमानतळ वापरण्यास परवानगी दिली होती. पाकिस्तानने अशा वृतांचे खंडण जरी केले असले तरीही अमेरिकी माध्यमांमध्ये याबद्दल दोरदार चर्चा सुरू आहे.
पाकिस्तान सध्या कथित शांतीदूत म्हणून इराण-अमेरिका देशांच्या संबंध सुधारण्यासाठी यजमानाच्या भूमिकेत आहेत. अशा बातम्यांमुळे इराणचा पाकवरील विश्वास उडून दोन्ही देशांमध्ये खटके उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बँकांकडून कर्ज घेण्याची गरज असल्याने पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसीम मुनीर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत.
🚨 BREAKING | EXTRAORDINARY 🔥 Pakistan is playing a dangerous double game! By day: Mediating between Iran and the US… By night: Hiding Iranian fighter jets at Nur Khan Airbase near Islamabad to protect them from American strikes! Mediator by day… Safe haven by night 🇵🇰🇮🇷🇺🇸… pic.twitter.com/a4im5i1iZ0
— سيف الدرعي| Saif alderei (@saif_aldareei) May 11, 2026
तरीही अमेरिकेला पाकिस्तानवर संशय आहे की, इराणची काही विमाने पाकिस्तानी एअरबेसवर होती. त्यांच्या बंदरावर इराणी फायटर जेट उपलब्ध होते. ज्यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर करण्यात महत्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे अमेरिकेशीही संबंध प्रस्थापित ठेवण्यात मदत केली. पाकिस्तानने जरी आपले हात झटकले असले तरीही अमेरिकन सिनेट अधिकाऱ्यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
Based on CBS's reporting about Pakistan allegedly storing Iranian aircraft at Nur Khan Airbase, imagery shared by sanctioned Chinese firm Mizarvision in April 2026 showed a sand camo C-130 on site, if Pak does not operate this livery, whose aircraft is it - serious replies only pic.twitter.com/MLH1f56ieZ
त्यांनी ट्रम्प यांचे कानही भरले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेसंदर्भात चौकशीची मागणी केली आहे. इराणच्या बाजूला झुकलेल्या पाकिस्तानच्या या लवंडेपणावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जर पाकिस्तानच्या या कृतीची चौकशी झाली आणि ते खरे निघाले तर हे धक्कादायक असेल, असे अमेरिकन सिनेटर ग्राम म्हणाले आहेत.
अमरीकी मीडिया रिपोर्ट में पाकिस्तान पर ईरानी विमानों को अपने एयरबेस में चुपचाप रखने का आरोप
स्वतःला निरपेक्ष आणि मध्यस्त्याच्या पोशाखात पाहणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा याआधीही फाटला आहे. यापूर्वीही त्यांनी इराणी जहाजांना थांबण्यास जागा दिली होती. ही गोष्ट उघड झाल्यानंतर अमेरिकेसमोर त्यांचा तीळपापड झाला होता. आता अमेरिका प्रश्न उपस्थित करत आहे की, पाकिस्तान गुप्तपणे इराणला समर्थन तर देत नाही ना?
पाकिस्तानी विदेशी मंत्रालयाकडून आले उत्तर
पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने याबद्दल उत्तर दिले आहे. ज्यात त्यांनी अशा वृत्तांना खारीज करण्याचा प्रयत्न केला. इराणने पाकिस्तानी हवाई अड्ड्यांचा वापर केला हे मान्य करण्यास पाकिस्तान धजावत नाही, अशी स्थिती आहे.