पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर सांस्कृतिक विभागाचे महत्वपूर्ण निर्णय;कान्स दौरा रद्द; ऑनलाईन बैठकांवर भर

    12-May-2026   
Total Views |
Cultural Affairs Department
 
मुंबई : (Narendra Modi) मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
 
याबाबत माहिती देताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "आज जगभरात युद्धजन्य परिस्थिती दिसत असून त्यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था आणि नागरिकांना सुविधा देणाऱ्या गरजू गोष्टींवर पडू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी पेट्रोल, डिझेल, सोने खरेदी, परदेश दौरे या सर्व गोष्टींवर मर्यादा आणण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
 
मी माझ्या विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा करून काही गोष्टी निश्चित केल्या आहेत. काही दिवसांत आमचे शिष्टमंडळ कान्स फिल्म फेस्टिवलला जाणार होते. परंतू, आता तिथे न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
 
हेही वाचा :  नवी मुंबईच्या भविष्यासाठी सिडकोची मोठी मोहीम;दोन वर्षांत ११० हेक्टर जमीन अतिक्रमणमुक्त;एरोसिटी, मेडिसिटीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती
 
तसेच आमच्या विभागात कमी कमी गाड्या वापरणे आणि शक्य झाल्या इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याचा आग्रह केला आहे. तसेच बहुतांश बैठका ऑनलाईन व्हाव्या, असाही प्रयत्न आम्ही करणार आहोत."(Narendra Modi)
 
ते पुढे म्हणाले की, "सामान्य जनतेनेही मर्यादित तेल किंवा पेट्रोलचा उपयोग करावा. जगात पुरवठा साखळी खंडित झाल्यावर अशी पावले उचलणे गरजेचे आहे,"(Narendra Modi)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....