मुंबई : (Maharana Pratap Jayanti Violence) उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यातील धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराणा प्रताप जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेदरम्यान शनिवारी अचानक हिंसाचार भडकला. हजारो लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या शोभायात्रेवर काही धर्मांध मुस्लिमांनी दगडफेक केल्याचे निदर्शनास आले. त्यालाच चोख प्रत्युत्तर म्हणून शोभायात्रेत सहभागी लोकांनी छतांवरून दगडफेक करणाऱ्यांना पकडून चांगलाच चोप दिल्याचे दिसतेय. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत अनेक युवक जखमी झाले असून एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.(Maharana Pratap Jayanti Violence)
मिळालेल्या माहितीनुसार, महाराणा प्रताप जयंतीनिमित्त देहरा गावात मोठी शोभायात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यात्रा गावातील मुस्लिमबहुल भागातून जात असताना काही युवक एका पानटपरीवर थांबले. याचवेळी काही कारणावरून युवकांमध्ये वाद झाला आणि तेवढ्यात परिसरात अचानक दगडफेक सुरू झाली.(Maharana Pratap Jayanti Violence)
पोलिसांच्या माहितीनुसार, २ ते ३ जण किरकोळ जखमी झाले असून एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर दगडफेक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली असून इतर उपद्रवींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.(Maharana Pratap Jayanti Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक