रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न - अमीत साटम;अमीत साटम यांचे रोहित पवार यांना प्रत्युत्तर

    12-May-2026
Total Views |
Inspection Of Mumbai Drain Cleaning
 
मुंबई : (Inspection Of Mumbai Drain Cleaning) "रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील होत्या, असे भासवण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. मुंबई शहरातील नालेसफाईची अधिकृत पाहणी सुरू होती. या पाहणी दौऱ्यात सहपालकमंत्री, आमदार, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
ताफ्यात ७-८ गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहने आमच्या ताफ्यात असल्याचे दाखवून '२५ गाड्यांचा ताफा' असल्याचा बनाव तुम्ही करत आहात. आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत.(Inspection Of Mumbai Drain Cleaning)
 
 
मी २१ व्या वर्षी बारामती ऍग्रो सारख्या कंपनीचा सीईओ झालो नाही, तर संघर्षातून इथवर आलो आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला शिकवण देण्याची अजिबात आवश्यकता नाही! "अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी मंगळवार दि.१२ रोजी आपल्या एक्स हँडलवरून आमदार रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिली आहे.(Inspection Of Mumbai Drain Cleaning)