मुंबई : (West Bengal Government Policy) पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजप सरकारने कट्टरपंथी प्रवृत्तींवर लगाम घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सुवेंदू अधिकारींनी पोलिसांना निर्देश दिलेत की, धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकरचा आवाज त्या परिसराच्या बाहेर जाऊ नये, याची खात्री करावी. तसेच नमाज किंवा प्रार्थना सभांसाठी रस्ते अडवून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी; फक्त विशेष प्रसंगीच अपवाद असू शकतो. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर IPS अधिकाऱ्यांसोबत झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.(West Bengal Government Policy)
मिळालेल्या माहितीनुसार, नबन्ना येथे झालेल्या बैठकीत डीजीपी एस. एन. गुप्ता, एडीजी (कायदा व सुव्यवस्था) अजय रानाडे आणि अजय नंदा यांसारखे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुवेंदु अधिकारी यांनी “कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे आणि कोणताही भेदभाव होता कामा नये,” असे स्पष्ट केले.(West Bengal Government Policy)
बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री यांनी भविष्यातील कायदा-सुव्यवस्थेची रूपरेषा स्पष्ट केली. अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यावर विशेष भर देण्यात आला. निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचार, गुंडगिरी आणि खंडणीसंदर्भातील प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करून अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सांप्रदायिक हिंसा भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. भाजपने निवडणुकीत कोळसा, वाळू आणि दगडांच्या अवैध तस्करीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणांमध्ये “झिरो टॉलरन्स” धोरण अवलंबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(West Bengal Government Policy)
राज्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात सतत आक्रमक भूमिका घेणाऱ्या काही मौलानांच्या भूमिकेत आता बदल दिसून येत आहे. काही इस्लामिक नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. नखोदा मशिदीचे ट्रस्टी नासिर इब्राहिम म्हणाले, “आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत. सरकार जर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामुळे रस्ते बंद होणार नाहीत याची खात्री करत असेल, तर आम्ही त्याचे समर्थन करतो. कायदा सर्व समुदायांवर समानपणे लागू झाला पाहिजे.”(West Bengal Government Policy)
तर सर्व भारतीय प्राच्य अकादमीचे प्राचार्य जयंत कुशारी म्हणाले, “सभ्य समाजाचे हेच स्वरूप असले पाहिजे. प्रार्थना ही वैयक्तिक आणि आध्यात्मिक बाब आहे. कोणत्याही धर्मग्रंथात लाऊडस्पीकर वापरणे अनिवार्य असल्याचे म्हटलेले नाही. सर्व धर्मांनी परस्पर आदर, नागरिक जबाबदारी आणि इतरांच्या अधिकारांचा सन्मान राखत एकत्र राहिले पाहिजे.(West Bengal Government Policy)
महिला अत्याचारांची जुनी प्रकरणे पुन्हा उघडणार
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींनी महिलांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना २०२१ आणि २०२४ मधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांसह बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न आणि छेडछाडीची जुनी प्रकरणे पुन्हा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.(West Bengal Government Policy)
गो-तस्करी रोखण्यावर भर
गो-तस्करी रोखण्यासाठीही सरकारने कडक भूमिका घेतली आहे. १४ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या जनावरांच्या वाहतुकीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल. अवैध कत्तलखाने चालू दिले जाणार नाहीत.(West Bengal Government Policy)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक