तलाव खोदकामात सापडली भगवान विष्णूंची प्राचीन अष्टधातूची मूर्ती

    12-May-2026   
Total Views |
Ancient Vishnu Idol Found

मुंबई : (Ancient Vishnu Idol Found) बिहार मधील जहानाबाद जिल्ह्यातील एका गावात तलावाच्या खोदकामादरम्यान भगवान विष्णूची प्राचीन अष्टधातूची मूर्ती सापडली आहे. मखदुमपुर प्रखंडातील चाँढ़ गावात जेसीबी मशीनच्या सहाय्याने तलावाची साफसफाई आणि खोलीकरणाचे काम सुरू असताना मजुरांना मातीखाली दबलेली दुर्मीळ मूर्ती आढळली.(Ancient Vishnu Idol Found)
 
मूर्ती बाहेर काढल्यानंतर ती भगवान विष्णूंची अत्यंत आकर्षक आणि प्राचीन अष्टधातूची प्रतिमा असल्याचे स्पष्ट झाले. पाण्याने स्वच्छ केल्यानंतर मूर्तीचे तेजस्वी आणि चमकदार स्वरूप पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. मूर्ती सापडल्याची बातमी काही वेळातच संपूर्ण परिसरात पसरली आणि आजूबाजूच्या गावांतील मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी दाखल झाले.(Ancient Vishnu Idol Found)
 
ग्रामस्थांनी “भगवान विष्णू” यांच्या जयघोषात स्वागत केले, तर महिलांनी मंगलगीते गात पूजा-अर्चना केली. गावकऱ्यांच्या मते, ही मूर्ती गावाच्या प्राचीन इतिहासाची तसेच येथे एखादे जुने मंदिर किंवा प्राचीन संस्कृती अस्तित्वात असल्याची साक्ष देणारी असू शकते.(Ancient Vishnu Idol Found)
 
सध्या ही मूर्ती गावातील सूर्य मंदिरात सुरक्षित ठेवण्यात आली असून तिची पूजा सुरू करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या स्थळाच्या ऐतिहासिक महत्त्वाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच गावात मंदिर उभारून या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.(Ancient Vishnu Idol Found)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक