सनातन धर्माचे समूळ उच्चाटन व्हायला हवे! सुंभ जळला पण पीळ जाईना! सत्ता गेल्यानंतरही स्टॅलीन पुन्हा बरळला

२०२३ मध्येही उदयनिधी स्टॅलिन याने असेच सनातनविरोधी वक्तव्य केले होते. त्यावेळी त्याच्या विधानावर देशभरात मोठा वादंग निर्माण झाला होता

    12-May-2026   
Total Views |
Udayanidhi Sanatan Controversy Tamilnadu
 
मुंबई : (Udayanidhi Sanatan Controversy Tamilnadu) तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेता उदयनिधी स्टॅलिन याने सनातन विरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली. विधानसभेत बोलताना त्याने 'लोकांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या सनातनचे पूर्णतः उच्चाटन व्हायला हवे' असे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रसंगी तमिळनाडूचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री विजय हे सुद्धा विधानसभेत उपस्थित होते.(Udayanidhi Sanatan Controversy Tamilnadu)
 
यापूर्वी २०२३ मध्येही उदयनिधी स्टॅलिन याने असेच सनातनविरोधी वक्तव्य केले होते. त्यावेळी त्याच्या विधानावर देशभरात मोठा वादंग निर्माण झाला होता. भाजपाने त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी आंदोलने केली होती. आता पुन्हा हे विधान केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Udayanidhi Sanatan Controversy Tamilnadu)
 
हेही वाचा : ममता सरकारमधील नियुक्त पदाधिकाऱ्यांना तात्काळ हटवणार!
 
यापूर्वी तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्सच्या एका कार्यक्रमात उदयनिधी स्टालिनने सनातन धर्माच्या उच्चाटनाची भाषा वापरली होती. सनातन धर्म सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचे त्याने म्हटले होते. तसेच सनातन धर्माची तुलना 'डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना' यांच्याशी करत तो नष्ट केला पाहिजे, असे विधानही त्याने केले होते.(Udayanidhi Sanatan Controversy Tamilnadu)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक