मुंबई : (Mumbai Drug Racket Busted) मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. विविध कारवायांमध्ये क्राइम ब्रँच आणि नार्कोटिक्स पथकाने मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केल्याचे निदर्शनास आले. एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली असून कांदिवलीत झालेल्या स्वतंत्र कारवाईत आणखी दोन तस्करांना पकडण्यात आले आहे.(Mumbai Drug Racket Busted)
मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट-४ ने अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळवले. नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बॅक रोडवरील ‘छेडा आदर्श’ इमारतीमध्ये अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तेथे छापा टाकत झालेल्या कारवाईदरम्यान फिरदौस अरबाज कुरेशी या महिला आरोपीला अटक करण्यात आली. तिच्याकडून सुमारे ३ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.(Mumbai Drug Racket Busted)
छापेमारीदरम्यान महिला आरोपीचा पती आणि मुख्य सूत्रधार अरबाज वकील कुरेशी हा घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. मात्र, आरोपी महिलेच्या चौकशीतून पोलिसांना या ड्रग्ज नेटवर्कची मोठी साखळी उघडकीस आली. त्यानंतर मुंबईतील विविध भागांमध्ये आणि गुजरातमध्ये एकाच वेळी शोधमोहीम राबवण्यात आली.(Mumbai Drug Racket Busted)
कांदिवलीत हेरॉईनसह दोन तस्कर अटकेत
कांदिवली परिसरात नार्कोटिक्स क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा येथील यारी रोड परिसरात छापा टाकून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ७६५ ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३ कोटी ८२ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेले सर्व अमली पदार्थ ताब्यात घेत आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या ड्रग्ज रॅकेटशी आणखी कोणाचा संबंध आहे आणि त्याचे जाळे मुंबईतील कोणकोणत्या भागांपर्यंत पसरले आहे, याचा तपास आता सुरू आहे.(Mumbai Drug Racket Busted)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक