मुंबई : (Food Inflation) भारतात सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या महागाई दरांची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. मंगळवार, दि. १२ मे रोजी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२६मध्ये घाऊक महागाई दरात वृद्धी नोंदविण्यात आली आहे. मार्च महिन्यातील महागाई दर हा ३.४० टक्के इतका होता. एप्रिलमध्ये तो वाढून ३.४८ टक्क्यांवर पोहोचला. दिलासादायक म्हणजे रिझर्व्ह बँकेने अंदाजित केलेल्या या आकडेवारीच्या तुलनेत हा कमीच आहे.
या आकडेवारीनुसार, गावातील महागाई ही शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे निरिक्षण आहे. ग्रामीण भागात महागाई दर ३.७४ टक्के इतकी आहे, शहरात ही आकडेवारी ३.१६ टक्के इतकी आहे. ज्यात खान-पान सहीत अन्य गोष्टींचा विचार केला असता खाद्य महगाई ४.२६ टक्के आणि शहरांमध्ये ४.१० टक्के इतकी होती.(Food Inflation)
जेवणाच्या थाळीचा विचार केला तर, टोमॅटो आणि फ्लावरच्या भाजीने चव बिघडवली आहे. टोमॅटोच्या किंमतीत ३५.२८ टक्के आणि फ्लॉवरच्या दरात २५.५८ टक्के वाढ झाली. याऊलट कांदा आणि बटाट्यांच्या किंमती घसरल्या. बटाटा २३.६९ टक्क्यांनी व कांदा १७.६७ टक्के स्वस्त झाला यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता.(Food Inflation)
महागाईचा सर्वात जास्त तगडा झटका ज्वेलरी आणि किंमती धातूंच्या वस्तूंची चैन असणाऱ्या ग्राहकांना लागला आहे. चांदीच्या दागिन्यांच्या किंमती १४४.३४ टक्क्यांनी वाढल्या. सोने, हिरे आणि प्लॅटीनम ४०.४२ टक्क्यांनी वाढले. वाहन खरेदी स्वस्त झाल्याचे दिसून आले. मोटार कार आणि जीपच्या किंमती ७.१२ टक्क्यांनी घसरल्या. राज्यांचा विचार केला तर लक्षात येईल की, तेलंगाणा ५.८१ टक्क्यांनी महागाई दराच्या सर्वात वर होते. दिल्लीत १.९६ टक्के उ.प्रदेशात ३.५९ टक्के इतकी महागाई होती.(Food Inflation)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.