ओमानमधून ब्रिटानिया भारतात!

    12-May-2026
Total Views |
Britannia Industries Export Business

मुंबई : (Britannia Industries Export Business) पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम तेथील उद्योजकांवरही होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक उद्योजकांनी पश्चिम आशियातील त्यांचा व्यवसाय स्थानांतरित करण्यास सुरुवात केली असून, त्यांची पहिली पसंती भारतालाच असल्याचे दिसत आहे. बेकरी उत्पादनांमधील अग्रणी कंपनी असलेल्या ब्रिटानियाने उत्तर अमेरिकेतील निर्यात करण्याचा ओमानमधील व्यवसायाचे स्थानंतरण केले असून, गुजरातमधील मुंद्रा येथे हा व्यवसाय सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे.(Britannia Industries Export Business)
 
पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला असून, विविध उद्योगांनाही सध्या त्याच्या झळा बसू लागल्या आहेत. ब्रिटानियासारख्या कंपनीलाही इंधनदरवाढीच्या झळा बसल्या असून, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणामही व्यवसायावर होत आहे. त्यामुळेच ब्रिटानियाने उत्तर अमेरिकेमध्ये निर्यात करण्याचा ओमानमधील व्यवसाय गुजरातच्या मुद्रा येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला.(Britannia Industries Export Business)
 
सध्या इंधन हे संकट असून, आम्ही एलपीजी, पीएनजीचा वापर करतो. त्यामुळे त्याच्या किमतीतील परिणामांचा फटका बसत असल्याचे ब्रिटानियाचे व्यवस्थापकिय संचालक रक्षित हरगावे यांनी सांगितले. तसेच, पुरवठा साखळीतील व्यत्यय, पॅकेजिंग साहित्यावरही या युद्धजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम होत असल्याचेही हरगावे यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे या संकटाचा सामना करताना भाववाढ ही करावीच लागणार असल्याकडेही हरगावे यांनी लक्ष वेधले. मात्र, ही भाववाढ सरसकट न करता मोठ्या पॅकेट्सवर ती केली जाईल. तसेच, लहान लहान वजनातील अधिक पॅकेट्सचाही विचार कंपनी करत असल्याचे ते म्हणाले.(Britannia Industries Export Business)
 
ब्रिटानिया कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या मार्च तिमाहीमध्ये एकत्रित निव्वळ नफ्यात २१.५६ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, हा नफा ६७९.६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, विक्रीमध्येही ७ टक्क्यांनी वाढ होऊन, ४ हजार ६८५.९५ कोटी रुपयांवर ती पोहोचली.(Britannia Industries Export Business)
 
कंपनीच्या विक्रीमध्ये क्विक कॉमर्सचा वाटा मोठा!
 
पारंपारिक विक्री व्यवस्थेला पर्याय म्हणून आलेल्या क्विक कॉमर्सने अल्पकाळातच प्रगती केली असून, त्याचा लाभ आता ब्रिटानियासारख्या कंपन्यांनाही दिसू लागला आहे. ब्रिटानियाच्या एकूण ऑनलाईन विक्रीपैकी ७० टक्क्यापेक्षा जास्त विक्री क्विक कॉमर्सच्या माध्यमातून झाली आहे. तसेच, भविष्यात हे प्रमाण ८५ टक्क्यापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.(Britannia Industries Export Business)