रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात?; तीन दिवस युद्धविराम
11-May-2026
Total Views |
मॉस्को : (Russia-Ukraine War) "रशिया-युक्रेन युद्ध आता अखेरच्या टप्प्यात आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की मला भेटण्यास तयार आहेत,” असे स्लोवाकियाचे फिको यांनी सांगितले. "आम्ही लवकरच एका त्रयस्थ देशात भेटू शकतो,” असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी सांगितले.
रशियात शनिवार, दि. ९ मे रोजी मॉस्को रोडच्या रेड स्क्वॉयरमध्ये विजयी दिवस साजरा करण्यात आला. नाझी जर्मनीवर सोव्हिएत संघाचा विजय आणि दुसर्या महायुद्धात मारले गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाआधीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन दिवसांसाठी युद्धविराम झाल्याची घोषणा केली. रशिया आणि युक्रेनही याला पुष्टी दिली. दि. ९ मे ते दि. ११ मे या काळात सर्व सैन्य कारवाई स्थगित केल्याचे दोन्ही देशांनी सांगितले.(Russia-Ukraine War)