डॉ. अनिलकुमार गायकवाड आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघाच्या भारतीय शाखेच्या अध्यक्षपदी

Total Views |
Road Infrastructure India
 
मुंबई : (Road Infrastructure India) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (एमएसआरडीसी) गौरवाची बाब ठरावी अशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघाच्या भारतीय शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 
नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये दि. ९ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान डॉ. गायकवाड यांनी औपचारिकरीत्या या पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. एमएसआरडीसीचे जागतिक स्तरावरील प्रतिनिधित्व अधिक बळकट करताना, महामंडळाचे मुख्य अभियंता एस. के. सुरवसे यांची आयआरएफ भारतीय शाखेच्या संचालक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
हेही वाचा :  गरज असेल तरच इंधन वापरा;पश्चिम आशियातील संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन
 
१९४८ मध्ये स्थापन झालेला आणि जिनिव्हा येथे मुख्यालय असलेला आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघ हा एक स्वयंसेवी व ना-नफा तत्त्वावर कार्य करणारा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संघटनात्मक मंच आहे. सुरक्षित रस्ते, शाश्वत वाहतूक व्यवस्था, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या परिवहन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ही संस्था कार्यरत आहे.(Road Infrastructure India)
 
यावेळी बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, “भारतामध्ये वाहतूक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडत असताना आयआरएफ इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. सुरक्षित, स्मार्ट आणि शाश्वत गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम पद्धतींच्या अनुषंगाने उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि विविध संबंधित घटकांसमवेत कार्य करण्यास मी उत्सुक आहे.(Road Infrastructure India)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.