आसाममध्ये पुन्हा हिमंता बिस्व सरमा मुख्यमंत्री

    11-May-2026
Total Views |
Himanta Biswa Sarma Chief Minister
 
दिसपूर : (Himanta Biswa Sarma Chief Minister) आसामचे पुढील मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा असतील. रविवार, दि. १० मे रोजी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. हिमंता बिस्व सरमा दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता तिसर्‍यांदा आणि भाजप नेते म्हणून सलग दुसर्‍यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. दि. ४ मे रोजी आलेल्या निकालांमध्ये भाजपने राज्यातील १२६ पैकी ८२ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता.
 
हेही वाचा :  गरज असेल तरच इंधन वापरा;पश्चिम आशियातील संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन
 
शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे शीर्ष नेतृत्व आणि एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. हिमंता बिस्व सरमा यांचा राज्याभिषेक ईशान्येकडील प्रदेशात पक्षाची पकड आणखी मजबूत करणारा म्हणून पाहिला जात आहे. मागील कार्यकाळात आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळणार्‍या सरमा यांच्यावर आता संपूर्ण राज्याला नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी असणार आहे.(Himanta Biswa Sarma Chief Minister)