काठमांडू : (Government Of Balen) नेपाळमधील बालेन सरकारने भारतीय नागरिकांसाठी नवा नियम लागू केला आहे. आता नेपाळमध्ये जाणार्या भारतीय नागरिकांकडे ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
तसेच, नेपाळमधून भारतात येणार्यांनाही आपले परिचयपत्र दाखवावे लागणार आहे. आधारकार्ड किंवा सरकारने जारी केलेले इतर कोणतेही वैध ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरले जाईल. नेपाळ प्रशासनाने शनिवार, दि. ९ मे रोजी या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.