नवी दिल्ली : (Devendra Fadnavis Criticism On Rahul Gandhi) राहुल गांधी हे देशातील सर्वाधिक रिजेक्टेड माल आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी जे सांगितले त्याचा अर्थ राहुल गांधी यांना कळला नसेल तर त्यांना दोष देता येणार नाही. त्यांची समजच कमी आहे. पण जनतेला अर्थ कळला असून जनता त्याला प्रतिसाद देईल. राहुल गांधी हे देशातील सर्वाधिक नाकारलेले नेते आहे. ते रिजेक्टेट माल आहेत. त्यांना लोकांनी रिजेक्ट केले आहे. लोकशाहीत ज्यांना लोक स्विकारतात तेच महत्वपूर्ण असतात. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांना महत्व देत नाहीत. देश मोदीजींसोबत उभा आहे."
केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे की, त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यात कुणीही मानत नाही. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेऊ शकत नाही आणि राज्याला एकत्रित ठेवू शकत नाही. कर्नाटकमध्ये आपण तेच बघत असून केरळमध्येही तेच होत आहे."(Devendra Fadnavis Criticism On Rahul Gandhi)
सीआयआय परिषदेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज ‘सीआयआय’च्या वार्षिक परिषदेत मी महाराष्ट्रासंदर्भात सांगितले. विशेषत: या वार्षिक परिषदची थीम ही भविष्यात महाराष्ट्र कसा असेल आणि आम्ही तो कसा घडवतो, ही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आज महाराष्ट्र सर्वोच्च स्थानावर आहे. परकीय गुंतवणूक, निर्यात, स्टार्टअप यात महाराष्ट्र नंबर वन आहे. या सगळ्या महाराष्ट्राच्या क्षमतांसह आम्ही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी कशी तयार करतो, याची माहिती मी इथे दिली."(Devendra Fadnavis Criticism On Rahul Gandhi)
ते पुढे म्हणाले की, "२०२५ ते २०३० आपले बहुवर्षीय वीज दर मंजूर झाले असून ते लागू झाले आहे. आतापर्यंत दरवर्षी ९ टक्के वीजेचे दर वाढत होते. आता उद्योगांकरिता दरवर्षी २ ते ३ टक्के भाव कमी होणार आहेत आणि या पाच वर्षात घरगुती वीजेचे २६ टक्क्यांनी भाव कमी होणार आहेत."(Devendra Fadnavis Criticism On Rahul Gandhi)
मोदीजींच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा
"आता ज्याप्रकराची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा ताण पडतो आहे. आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव साडे चारशे रुपयांपर्यंत वर गेले आहेत. अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलची कमतरता आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पण आपल्याला अनिर्बंध वापर करता येणार नाही, हे मोदीजींनी सांगितले आहे. पुरवठा साखळीवर असलेल्या ताण आणि आपल्याला जास्तीत जास्त परकीय चलन कसे वाचवता येईल हे बघता प्रत्येक गोष्टीत तर्कसंगतीकरण केले पाहिजे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केलेले आवाहन योग्य असून त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा," असेही ते म्हणाले.(Devendra Fadnavis Criticism On Rahul Gandhi)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....