Maharashtra Karnataka Border : बेळगावसाठी काँग्रेसला जाब विचारा – नवनाथ बन

    01-May-2026
Total Views |
navnath ban
 
मुंबई : (Maharashtra Karnataka Border) भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.१ रोजी बेळगाव प्रश्नावरून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, “बेळगावसाठी कुणी काय केलं हे विचारण्यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला जाब विचारावा. तसेच राहुल गांधी यांनाही पत्र लिहाव. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बेळगाव प्रश्न सोडवण्यासाठी एकही ठोस पाऊल उचललं नाही. त्यामुळे राऊतांनी आधी मातोश्रीवर जाऊन उत्तर मागावं."
 
नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या राजकीय प्रभावावर निशाणा साधत म्हटलं की, “तुमचा स्कोप आणि स्केल महाराष्ट्रातील जनतेनेच ठरवून दिला आहे. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकांमधील भोपळा हाच तुमचा स्केल. जनतेचा आशीर्वाद मिळवणं हेच खऱ्या अर्थाने स्कोप ठरवतं, तुमच्यासारख्या नेत्यांच्या हातात तो अधिकार नसतो." (Maharashtra Karnataka Border)
 
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत मोठा राजकीय अंदाज व्यक्त केला की,“साडेपाचशे दिवस शिल्लक असल्याचं सांगणारे राऊत आता स्वतःचे दिवस मोजत आहेत. तसेच काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी राऊत प्रयत्नशील आहेत. त्यांची भविष्यात काँग्रेसच्या कोट्यातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे." (Maharashtra Karnataka Border)
 
 
मराठी भाषेच्या मुद्द्यावर नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबावर टीका केली. “मराठी अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं?” राज्यातील प्रत्येकाने मराठी शिकावी हा आमचा आग्रह आहे, पण तुमच्या वर्तनात मात्र दुटप्पीपणा दिसतो."असे बन म्हणाले. (Maharashtra Karnataka Border)
 
हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीवरून नवनाथ बन यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले की,“राज्य सरकार आणि मुंबई महापालिका हुतात्मा स्मारकाची योग्य काळजी घेतील पण तुमच्या विचारांची जी पडझड झाली आहे, तिची दुरुस्ती कोण करणार?” (Maharashtra Karnataka Border)