Maharashtra Census 2027 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ
राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन
01-May-2026
Total Views |
मुंबई : (Maharashtra Census 2027) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करत भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा आज मुंबई येथून शुभारंभ केला. तसेच, या राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन देखील यांनी यावेळी केले.
भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ अंतर्गत १ मे पासून प्रथम टप्पा अर्थात स्व-गणनेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथील लोकभवन या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी राज्यपाल यांच्या पत्नी सुधा देव वर्मा उपस्थित होत्या.(Maharashtra Census 2027)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून जनगणना-२०२७ मध्ये नोंद केली. यावेळी, मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस यांची उपस्थिती होती.(Maharashtra Census 2027)
तर, मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती चंद्र शेखर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह अन्य मान्यवरांनीही स्व-गणना करुन जनगणना मोहीमेत सहभाग नोंदवला.(Maharashtra Census 2027)
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महाराष्ट्राच्या प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) एम. देवेंदर सिंह, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसंचालक (जनगणना) संतोष पायस, जनगणना उप महानिबंधक ए. एन. राजीव, महानगरपालिका जनगणना अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.(Maharashtra Census 2027)
याबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक १ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीने स्व-गणना करायची आहे. यासाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून स्व-गणना करावी लागेल. तसेच, यामध्ये दिलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अवघ्या दहा मिनिटात स्व-गणना करता येणे शक्य आहे. याच अंतर्गत दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी करतील. जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होईल. ज्यामध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गणना करण्यात येईल.(Maharashtra Census 2027)
बृहन्मुंबई क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने सुमारे २५ हजार कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईकर नागरिकांनी या जनगणनेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तसेच, जनगणनेसाठी गृहभेटी देणाऱ्या प्रगणकांना योग्य माहिती द्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विपिन शर्मा यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.(Maharashtra Census 2027)