Labour Day Mumbai : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाजयुमो मुंबईतर्फे मुंबईत १५० हून अधिक ठिकाणी “कामगार सन्मान कार्यक्रम” उत्साहात संपन्न.
01-May-2026
Total Views |
मुंबई : (Labour Day Mumbai) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे शुक्रवार दि.१ रोजी संपूर्ण मुंबईत १५० हून अधिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत “कामगार सन्मान कार्यक्रम” तसेच “सामूहिक महाराष्ट्र गीत” सादर करून कामगारांच्या योगदानाला मानाचा मुजरा देण्यात आला आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यात आला. (Labour Day Mumbai)
हे सर्व कार्यक्रम भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमांमध्ये भाजयुमो मुंबई, जिल्हा, मंडळ व वॉर्ड स्तरावरील शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध ठिकाणी कामगार बांधवांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी “जय जय महाराष्ट्र माझा” या प्रेरणादायी महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने वातावरण देशभक्ती व अभिमानाने भारावून गेले. (Labour Day Mumbai)
पहिल्यांदाच एवढ्या व्यापक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या “कामगार सन्मान कार्यक्रमां”मुळे कामगारांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. (Labour Day Mumbai)
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांनी सांगितले की, "महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, परिश्रम आणि स्वाभिमानाची भूमी आहे. आजचा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आहे. तसेच कामगार दिनानिमित्त (Labour Day Mumbai)
राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या प्रत्येक श्रमिकाचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या कष्ट, समर्पण आणि श्रमामुळेच राष्ट्र आणि राज्य प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे.भाजयुमो मुंबई नेहमीच कामगारांच्या सन्मान, हक्क आणि उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहे. ‘श्रमेव जयते’ या मंत्राने प्रेरित होऊन एक सक्षम, समृद्ध आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू." (Labour Day Mumbai)
तसेच त्यांनी नमूद केले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वात महाराष्ट्र विकासाची नवी उंची गाठत आहे. या प्रवासात युवक व कामगारांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. कामगारांचे सशक्तीकरण हेच राष्ट्रनिर्मितीचे भक्कम अधिष्ठान आहे आणि राज्य सरकार त्या दिशेने सातत्याने कार्यरत आहे." (Labour Day Mumbai)