Kolhapur Gokul Sangh : गोकुळ वर प्रशासक अन् निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढणार ?

    01-May-2026
Total Views |
GOKUL SANGH
 
मुंबई : (Kolhapur Gokul Sangh) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वर प्रशासक येणार तसेच त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. येत्या ४ मे रोजी गोकुळ संघाच्या विद्यमान संचालकांची मुदत संपणार आहे. सभासद संस्था अन् अवसायन मधील संस्थाबाबत याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ विरोधात कोल्हापूर सर्किट बेंचकडे तक्रार दाखल केली होती.याबाबत सुनावणीत गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळास एक वर्ष मुदतवाढ देण्याची विनंती गोकुळ कडून करण्यात आली होती.पण अशी मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गुरुवार दि.३० रोजी स्पष्ट नकार दिला.(Kolhapur Gokul Sangh)
 
तसेच अवसायनात गेलेल्या संस्थांची सुनावणी ८० दिवसात पूर्ण करा असा निर्णय कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे.(Kolhapur Gokul Sangh)
 
त्यामुळे किमान अजून चार महिने गोकुळची निवडणूक पुढे जाणार आहे.गोकुळ मध्ये वाढीव जवळपास १३०० दूध उत्पादक सभासद करण्यात आल्याबद्दल वाद सुरू असून, याबाबत बेलवाडे यांनी रान उठवले होते आणि त्यांच्या तक्रारी नंतर सहाय्यक निबंधक ( दुग्ध) सांगली व जिल्हा विशेष लेखापरीक्षक (पदुम) सांगली यांची चौकशी समिती नेमली होती.तर आमदार शिवाजी पाटील यांनी १२ एप्रिल रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालय , मुंबई येथे गोकुळ च्या चौकशीची मागणी केली होती.यात प्रकाश बेलवाडे, आमदार शिवाजी पाटील,गोकुळ संचालिका शौमिका महाडिक एका बाजूला आणि मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील दुसऱ्या बाजूला असा कलगीतुरा सुरू आहे.(Kolhapur Gokul Sangh)
 
 
प्रशासक लावणे तसेच निवडणूक लौकर पार पाडणे की निवडणूक बिनविरोध करणे, वाढीव सभासद या एकूण घडामोडीं संदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मंगळवार दि.२८ रोजी जी बैठक झाली होती यावेळी कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आबिटकर,उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजी पाटील,शौमिका अमल महाडिक, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांसह महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख आमदार आणि नेते उपस्थित होते. यासंदर्भात या सर्व नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. यानंतर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी पारदर्शक कारभारासाठी गोकुळवर प्रशासक येणार असे माध्यमांसमोर सांगितले होते.(Kolhapur Gokul Sangh)
 
एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेल्या गोकुळ बाबत काय होते ते लौकरच समजेल.पण गोकुळ ने राज्यातील राजकीय वातावरण मात्र दुग्धजन्य पदार्थांच्या पेक्षाही ढवळले जात आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिकाच अत्यंत निर्णायक ठरणार आहे.(Kolhapur Gokul Sangh)
तर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले होते की,"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत." तसेच गोकुळबाबत अपुऱ्या माहितीवरील कोणत्याही बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही नवीद मुश्रीफ यांनी केले होते.(Kolhapur Gokul Sangh)