राणी खेमा ते भिक्खूनी खेमा

    01-May-2026
Total Views |
Khema & Gautam Buddha
  
रूप क्षणभंगुर आहे. तारुण्य चिरकाल नाही. जगात नित्य परिवर्तन होते. त्याला माणसाचा नश्वर देहही अपवाद नाही. ‘रूपगर्विता खेमा ते भिक्खुणी खेमा’चा प्रवास हेच सांगतो. राणी आणि सौंदर्यवती खेमा ही भिक्खुणी कशी झाली? तिच्या सौंदर्याचा गर्व कसा आणि का गळून पडला, हे परिवर्तन बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे सार सांगते. याबद्दल या लेखात मांडणी केली आहे.
 
भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात आणि त्यांच्या धम्म प्रचारात महिला शिष्या भिक्खुणींचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.बुद्धांनी तत्कालीन सामाजिक रूढींना झुगारून महिलांना संघात प्रवेश दिला. बुद्धांचे अति प्रिय शिष्य भिक्कूआनंद यांच्या विनंतीने कोणताही लिंगभेद न मानता महिलांना संघात प्रवेश बुद्धांनीही मान्य केला.बुद्धांच्या काही प्रमुख महिला शिष्या भिक्खुणी खालीलप्रमाणे, महाप्रजापती गौतमी, आम्रपाली, विशाखा, खेमा, उप्पलवना, यशोधरा, सुजाता या होत्या. खेमा या बुद्धांच्या प्रमुख महिला शिष्यांमधून एक होत्या.
 
मगधचे राजा बिंबिसार यांच्या त्या पत्नी होत्या. नंतर त्यांनी भिक्खुणी रूपात प्रवज्जाग्रहण केले. खेमा यांचा जन्म मद्रा राज्यात ऐका शाही परिवारातील होता. मगधचे राजा बिंबिसारच्या त्या पत्नी होत्या. खेमा खूप सौंदर्यवान, रूपवान होत्या. स्वतःच्या रूपाचा त्यांना खूप गर्वही होता. शारीरीक सौंदर्याला अंतिमतेचे स्वरूप त्या समजायच्या. तर राजा बिंबिसार हे बुदध विचारांचे पाईक. शारीरीक सौदर्य क्षणभंगूर असते हे विचार माननारे होती. गौतम बुद्धांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची खूप इच्छा होती की, राणी खेमाने बुद्धांची एकदा भेट घ्यावी. राजाने राणीला भेटीसाठी खूप प्रेरित केले. पण राणीला ही भेट मान्य नव्हती. खेमाला ज्ञान होते की, बुद्ध त्यांच्या सौंदर्य व क्षणभंगुरता यांवर नक्कीच आलोचना करतील. म्हणून त्यांना भेट नको होती. परंतु, राजा बिंबिसारने वेनुवान विहाराच्या सौंदर्याचे इतके वर्णन केले की राणी विहाराकडे जाण्यास तयार झाली.
 
अनेक कथांमधून असे संदर्भ मिळतात की, जेव्हा खेमा बुद्धांच्या भेटीला पोहोचली. तेव्हा तिथे उपस्थितांमध्ये एक अत्यंत देखणी अनुपम सौंदर्यवती तरुणीही उपस्थित होती. तिचे सौंदर्य तारुण्य आणि तेज यापुढे खेमाचे सौंदर्य काहीच नव्हते. खेमा त्या सौंदर्यवतीला निरखतात. पण, अचानक त्या सुंदर तरुणीमध्ये परिवर्तन होते. ती वृद्ध होताना दिसते, तिची कांतिमान कोमल त्वचा जाऊन सुरकुतलेली त्वचा, मोत्यांसारखे दात पडतात, टपोरे डोळ्यांतही वृद्धत्वाची झाक येते. ती रूपवान तरुणी कृश वृद्धेत परावर्तित होते. हे पाहून खेमाच्या मनात विचार येताता. तारुण्य आणि सौंदर्य हे कायमस्वरूपी नाही, तर कितीही टाळले, तरी वृद्धत्व शरीराचा ताबा घेते. ज्या तारुण्यावर ज्या सौंदर्यावर गर्व केला जातो, ते वृद्धापकाळात परावर्तित होतेच. तिचा सौंदर्याचा गर्व नाश पावतो. पुढे बुद्धांचे उपदेश व प्रवचन एकूण खेमाला ज्ञान प्राप्त झाले. उपदेशात सांसारिक क्षणभंगुरता व शारीरिक सुंदरता वयानुसार नाशवंत होणार आहे. जेव्हा बुद्धांकडून हे ज्ञान प्राप्त झाले व तेव्हाच खेमाने भिक्खुणीच्या रूपात संघात प्रवेश केला. खेमाची बुद्धिमता, ज्ञान, विद्वान दूरदृष्टी पाहता, बुद्धांनी खेमाला सर्वोच्च भिक्खुणी महाप्रज्ञावती म्हणून नवीन ओळख निर्माण झाली. बुद्धांनी त्या युगात धम्मकार्यात स्त्री-पुरुष भिक्खुणीमध्ये समानता आणली.
 
- स्नेहा भालेराव