Buddha Purnima 2026 : “भगवान बुद्धांचा करुणा आणि समतेचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी” — रविंद्र चव्हाण

    01-May-2026   
Total Views |
Buddha Paurnima
 
मुंबई : (Buddha Purnima 2026) “भगवान बुद्धांनी दिलेला करुणा, शांतता आणि समतेचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त मुंबईतील पावन चैत्यभूमी येथे आयोजित वैशाख दीपोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.(Buddha Purnima 2026)
 
यावेळी भगवान गौतम बुद्ध आणि प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. चैत्यभूमी परिसर दीपोत्सवामुळे प्रकाशमय झाला होता. (Buddha Purnima 2026)
 
या कार्यक्रमास भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, अण्णासाहेब बनसोडे, माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
 
हेही वाचा : Jishnu Dev Verma : बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
 
यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी व नागरिकांनी उपस्थित राहून भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. (Buddha Purnima 2026)
 
 

सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.