मुंबई : (Nitesh Rane) नाशिकमध्ये घडलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणावरून मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणावर तीव्र भूमिका मांडली. त्यांनी या घटनेला केवळ गुन्हेगारी प्रकरण न मानता, सामाजिक आणि धार्मिक कटकारस्थानाचा भाग असल्याचा आरोप केला.(Nitesh Rane)
राणे (Nitesh Rane) म्हणाले की, या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 15 पीडित मुलींनी तक्रार दाखल केली असून, नाशिक पोलिसांनी तत्पर कारवाई केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त करत, “सरकारने कोणताही भेदभाव न करता पीडितांना न्याय मिळवून दिला,” असे त्यांनी नमूद केले.(Nitesh Rane)
या प्रकरणाच्या निमित्ताने राणे यांनी समाजालाही आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. “धर्माच्या नावाखाली चुकीचे प्रकार करणाऱ्यांविरोधात त्यांच्या समाजानेच भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा आम्हाला हिंदू समाजाला जागृत करण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.(Nitesh Rane)
राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आमच्या सरकारची सुरुवातीपासूनच हीच भूमिका आहे.” पत्रकार परिषदेत त्यांनी पीडित महिलांना धैर्याने पुढे येण्याचे आवाहन केले. “सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका,” असा विश्वास त्यांनी दिला.
राणे यांनी काही कॉर्पोरेट, फूड डिलिव्हरी आणि गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘मतपरिवर्तन’ किंवा ‘प्रलोभन’ दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला. यामागे आर्थिक व्यवहार आणि परदेशी संबंधांची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले. नाशिक पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Nitesh Rane)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.