नवी दिल्ली : (Parth Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांनी गुरुवारी ९ एप्रिल रोजी संसद भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या कार्यालयात खासदारकीची शपथ घेतली. सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.(Parth Pawar)
या वेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तसेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Parth Pawar)
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
तर दुसरीकडे बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली. ही पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला होता. दरम्यान काँग्रेसने आता माघार घेतली आहे.(Parth Pawar)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\