मुंबई: (Ashok Kharat Case) भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यासाठी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खरात याला गुरुवारी ९ एप्रिल रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.(Ashok Kharat Case)
दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, लगेचच एसआयटीने तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून, एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल, असे आमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.(Ashok Kharat Case)
सुनावणीदरम्यान सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद करत आरोपीविरुद्ध गंभीर आरोप मांडले. हे प्रकरण प्राथमिक अवस्थेत असून तपासासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. बागडे यांनी प्रत्युत्तर देताना प्रत्येक गुन्हा स्वतंत्र असून, त्यासाठी वेगळी चौकशी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आरोपी भाविकांना धमकावून पैसे उकळत असल्याचा आरोप असून, या पैशांची विल्हेवाट कशी लावली याचाही तपास करायचा आहे, असं त्यांनी सांगितले.(Ashok Kharat Case)
या प्रकरणात दोन पेनड्राइव्ह, एक लॅपटॉप आणि काही साहित्य जप्त करण्यात आलं आहे, त्यातला व्हिडिओंचा तपास प्रलंबित आहे. धार्मिक विधींचे चित्रीकरण करण्यात आलं आहे का, याचाही तपास सुरू आहे.(Ashok Kharat Case)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\