CM Devendra Fadnavis : नाशिकच्या कंपनीतील घटना गंभीर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    09-Apr-2026   
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
बीड : (CM Devendra Fadnavis) नाशिकच्या कंपनीतील घटना गंभीर असून पोलिसांनी ती उघडकीस आणली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बीड येथे माध्यमांशी बोलताना दिली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये त्यांनी ज्याप्रकारे दबाव आणून धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केले ते फारच धक्कादायक आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करून याचा पर्दाफाश केला आहे, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.”
 
“ज्या शेवटच्या कार्यक्रमात मी आणि गोपीनाथ मुंडे साहेब होतो, त्या कार्यक्रमाचा फोटो मला मिळाला असून माझे मन खूप भरून आले आहे. आमच्या जीवनामध्ये मुंडे साहेबांचे वेगळे स्थान आहे. आमच्या सर्व वाटचालीमध्ये त्यांचा एक मोठा वाटा आहे. त्यांच्याकडून आम्ही नेतृत्वगुण शिकलो, विधानसभेत काम कसे करावे, हे शिकलो. त्यामुळे हा फोटो मिळाल्यानंतर माझे मन भरून आले,” असेही ते (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....