Deputy CM Eknath Shinde : काम नाही तर पद नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी...

निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या

    09-Apr-2026   
Total Views |
Deputy CM Eknath Shinde
 
मुंबई : (Deputy CM Eknath Shinde) निवडणुका संपल्या असून आता राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान द्या, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी पक्षाच्या सर्व आमदार, खासदार, विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख तसेच लोकसभा संपर्कप्रमुखांना दिले. तसेच मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करा, काम दिसले नाही तर पद राहणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.(Deputy CM Eknath Shinde)
 
शिवसेनेच्या ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघांच्या विभाजनानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कामाचा रोडमॅप दिला. निवडणूक आयोगाकडून राज्यात राबवल्या जाणाऱ्या एसआयआर मोहीमेसाठी आतापर्यंत कोणी किती बीएलए नेमले, कितीवेळा मतदार संघाचा दौरा केला, किती बैठका घेतल्या? याची विचारणा त्यांनी संपर्कप्रमुखांना केली.(Deputy CM Eknath Shinde)
 
...तर थेट नारळ देणार
 
तसेच कामाचा अहवाल नसेल आणि जे काम करणार नाहीत, त्यांना थेट नारळ देणार, असा दम शिंदेंनी दिला. मतदार संघाचे विभाजन लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदार यादींचे बारकाईने पुनरावलोक करण्यासाठी दोन ‘बीएलए’ नियुक्त करावेत तसेच ‘बीएलए’सोबत रोज बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.(Deputy CM Eknath Shinde)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....