Green Asha LPG vessel : होर्मुझ पार करून ‘ग्रीन आशा’ भारतात दाखल! १५,४०० टन एलपीजीसह जेएनपीए बंदरात आगमन

    09-Apr-2026   
Total Views |


Green Asha

मुंबई : (Green Asha LPG vessel)
अमेरिका - इराण यांच्यामध्ये झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर १५ हजार ४०० टन एलपीजी घेऊन 'ग्रीन आशा' हे भारतीय तेलवाहू जहाज मुंबईतील बंदरावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी पार करून हे जहाज रायगड जिल्ह्यातील जेएनपीए बंदरात दाखल झाले.(Green Asha LPG vessel)

भारतीय ध्वज असलेल्या या जहाजाचं बंदरावर स्वागत करण्यात आले. जहाज, त्यावरील माल आणि सर्व कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थितीतही भारताचा एलपीजी पुरवठा सुरळीत सुरू राहू शकतो, हे स्पष्ट झाले आहे.(Green Asha LPG vessel)

विशेष म्हणजे, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर या मार्गाने पोहोचलेले हे पहिले जहाज ठरले आहे. त्यामुळे या घटनेला मोठे सामरिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक तणावाच्या काळातही भारताची ऊर्जा सुरक्षा सक्षम असल्याचं यामुळे अधोरेखित झाले आहे. (Green Asha LPG vessel)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\