बीड : (CM Devendra Fadnavis) नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे असून गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्न, तो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे. मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या या परंपरेचा समारोप गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी गहिनीनाथ गडाचे विठ्ठल महाराज, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आ. सुरेश धस, आ. धनंजय मुंडे, माजी आ. भीमराव धोंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.(CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “संत वामनभाऊ यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. नाथ संप्रदायात गहिनीनाथांचे महात्म्य मोठे असून, या गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. विशेष म्हणजे, या नारळी सप्ताहाचे नियोजन २०३९ पर्यंत निश्चित झाले आहेत यातच या भक्तीकार्याचे यश दिसते. समाजाला एकत्र आणण्याचे हे काम अतिशय मोलाचे आहे.”(CM Devendra Fadnavis)
गहिनीनाथ गडाचे पालकत्व घ्यावे – मंत्री पंकजा मुंडे
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह कायमस्वरूपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या यजमानपदाखाली व्हावा व त्यांनी गडाचे पालकत्व घ्यावे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या विचारांवर आपण काम करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....