मुंबई : (Baramati By-Elections) दिवसभरात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतून अखेर गुरुवारी काँग्रेसने माघार घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.(Baramati By-Elections)
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी सर्वत्र होत होती. मात्र, काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने हा अर्ज मागे घ्यावा यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना तीनदा फोन केले. तसेच गुरुवारी आधी रोहित पवार आणि नंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळांने सपकाळ यांची भेट घेतली. या सगळ्या घडामोडींनतर अखेर आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.(Baramati By-Elections)
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याशी संपर्क करून माघार घेण्याची विनंती केली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून विनंती केली. अजितदादांच्या दुर्दैवी आणि दु:खद निधनानंतर सुनेत्रा पवार या निवडणूकीत उभ्या आहेत. अशावेळी आपण बिनविरोध निवडणूका करतो, ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तिथे भाजपने आपला उमेदवार उभा केला नव्हता. हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी मी चर्चा केली त्यावेळी ते मला सकारात्मक वाटले.”(Baramati By-Elections)
बारामतीप्रमाणेच राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीतही मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश आल्याचे पाहायला मिळाले. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. “प्राजक्त तनपुरे हे अतिशय चांगले नेते आहेत. मागच्या काळात त्यांची कामगिरीही चांगली राहिली. त्यामुळे मी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Baramati By-Elections)
संस्कृती आणि सभ्यता म्हणून माघार - सपकाळ
याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांचे अपघाती निधन सर्वांच्या मनाला चटका लावून देणारे आहे. ही त्यांच्या मृत्यूपश्चात होणारी निवडणूक असल्याने या भावनिक भूमिकेला साथ देत काँग्रेस पक्षाने ही निवडणूक लढू नये, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यासंदर्भात तीनदा संपर्क केला. तसेच त्यांच्या नेत्यांनी माझी भेटही घेतली. रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनीदेखील काँग्रेसला विनंती केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर एक संस्कृती आणि सभ्यता म्हणून साथ देण्याची आमची भावना आहे. आमचे उमेदवार आकाश मोरे या निवडणूकीतून माघार घेतील, अशी सूचना त्यांन देण्यात आली.”(Baramati By-Elections)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....