Innovation City : मुंबई महानगर प्रदेशात इनोव्हेशन सिटी उभारण्यास गती

सामंजस्य करार ते प्रत्यक्ष अंमलबजावणी

Total Views |
Innovation City
 
मुंबई : (Innovation City) जानेवारी महिन्यात जागतिक आर्थिक परिषद २०२६, दावोस येथे मांडण्यात आलेले दूरदृष्टीपूर्ण आराखडा आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे.(Innovation City)
 
मुंबई महानगर प्रदेशात प्रस्तावित ‘इनोव्हेशन सिटी’ (Innovation City) स्थापित करण्याच्याच्या कामाला गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. गुरुवार, दि 9 एप्रिल रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.(Innovation City)
 
या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, सुचरिता चौधरी, प्रेसिडेंट – बिझनेस डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट अफेयर्स, टाटा सन्स प्रा.लि.चे ऋतेश मंडोत तसेच एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Innovation City)
 
जागतिक आर्थिक परिषद २०२६ मध्ये एमएमआरडीए, टाटा समूह आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली. या बैठकीत ‘इनोव्हेशन सिटी’चे कशी असेल याचे व्हिजन व धोरणात्मक दिशा, अंमलबजावणीचा रोडमॅप, संभाव्य भागीदारी, प्रकल्प पूर्णत्वासाठी वेळापत्रक याबाबत चर्चा झाली.(Innovation City)
 
सर्व संबंधित घटकांमध्ये स्पष्ट समन्वय साधला गेल्याने ‘इनोव्हेशन सिटी’ प्रकल्प (Innovation City) आता निश्चित कालमर्यादेत आणि संरचित पद्धतीने पुढे नेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाचे इनोव्हेशन इकोसिस्टम उभारण्यास तसेच महाराष्ट्राला तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेचे जागतिक केंद्र म्हणून अधिक बळकट करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(Innovation City)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.