Ashish Jaiswal : पारंपरिक पुजाऱ्यांच्या सन्मान आणि स्थैर्यासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण!

राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांची माहिती

    09-Apr-2026   
Total Views |
Ashish Jaiswal
 
मुंबई : (Ashish Jaiswal) राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सन्मानपूर्वक उपजीविकेसाठी राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक धोरण आणणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) यांनी दिली.
 
बुधवारी, मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी धर्मादाय आयुक्त एस. एस. कलोती, विधी व न्याय विभागाचे अवर सचिव कस्तुरे, उपसचिव खांडबदाले तसेच गुरव समाजाचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.(Ashish Jaiswal)
 
राज्यमंत्री आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले की, “सध्या पारंपरिक पुजारी वर्ग कोणत्याही ठराविक प्रशासकीय चौकटीत बसत नसल्यामुळे त्यांच्या सेवेला ना निश्चित वेतन आहे, ना कायदेशीर संरक्षण. परिणामी अनेक ठिकाणी त्यांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासन त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करत आहे.”(Ashish Jaiswal)
 
हेही वाचा : Deputy CM Eknath Shinde : काम नाही तर पद नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी...
 
राज्यभर एकसमान व न्याय्य प्रणाली विकसित करणार
 
“जसे सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार आणि गिग वर्कर्ससाठी स्वतंत्र धोरणे तयार करण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर परंतू, धार्मिक परंपरेचा सन्मान राखत पुजाऱ्यांना स्वतंत्र आणि सुसंगत दर्जा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देवस्थानांच्या उत्पन्नाचे पारदर्शक वितरण, पुजाऱ्यांचे मानधन निश्चित करणे तसेच त्यांच्या पारंपरिक हक्कांचे संरक्षण या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. काही ठिकाणी नियमित वेतन, तर काही ठिकाणी दक्षिणा स्वरूपात उत्पन्न मिळते. या विविध पद्धती लक्षात घेऊन राज्यभर एकसमान व न्याय्य प्रणाली विकसित केली जाणार आहे,” असेही राज्यमंत्री आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal)यांनी सांगितले.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....