Women Economic Empowerment in India : देशाच्या कर्जव्यवस्थेत महिलांचा सहभाग २६ टक्क्यांवर
महिलांना दिलेल्या एकूण कर्जाची रक्कम ७६ लाख कोटींवर
08-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Women Economic Empowerment in India) मोदी सरकारने राबविलेल्या महिला विकासाच्या विविध योजनांना यश मिळत असून, देशातील कर्जव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढत असल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महिलांनी विविध कारणांसाठी घेतलेल्या एकूण कर्जाची रक्कम ७६ लाख कोटींवर पोहोचली असून, देशाच्या एकूण कर्ज वितरणामध्ये महिलांचा असलेला वाटा २६ टक्के झाला आहे.(Women Economic Empowerment in India)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या जवळपास 12 वर्षांत केंद्र सरकारने महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवल्या होत्या. यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या हेतूनेही अनेक योजनांचा समावेश करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या या महिला केंद्री योजनांना यश मिळाले असून,देशाच्या पतपुरवठ्यातील कर्जामध्ये महिलांचा वाटा सातत्याने वाढताना दिसत आहे. अलीकडेच नीती आयोगाने महिला उद्योजकता मंच्याच्या माध्यमातून तयार केलेल्या अहवालानुसार हा वाटा 26 टक्क्यांवर पोहोचला आहे.(Women Economic Empowerment in India)
महिलांचा हा कर्जव्यवस्थेतील वाटा सातत्याने वाढता असून, यापूर्वी 2017 साली महिलांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम सुमारे 16 लाख कोटी एवढी होती. त्यानंतरच्या कालावधीत यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या देशात सुमारे 16 कोटी महिला कर्जदार असल्याचे अहवालामध्ये नमूद असून, महिलांनी घेतलेल्या कर्जाच्या स्वरूपातही बदल झाला आहे.(Women Economic Empowerment in India)
पूर्वी देशातील महिलांचे कर्जव्यवस्थेतील योगदान प्रामुख्याने सूक्ष्म वित्त संस्थांकडून घेतल्या जाणार्या लहान कर्जांपुरतेच मर्यादित होते. मात्र, आता गृहकर्ज, व्यवसाय कर्ज आणि इतर मोठ्या स्वरूपातील कर्जांमध्येही महिलांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढत आहे. तसेच, डिजिटल व्यवहारांचा प्रसार, बँकिंग सेवा सुलभ होणे आणि विविध शासकीय योजनांमुळेही महिलांना औपचारिक कर्जप्रणालीत प्रवेश करणे सोपे झाले आहे. स्वयंसहाय्यता गट आणि वित्तीय समावेशनाच्या उपक्रमांचाही महिलांची कर्जव्यवस्थेतील स्थिती सुधारण्यामध्ये मोठा वाटा राहिला आहे.(Women Economic Empowerment in India)
दरम्यान, देशात कर्जासाठी पात्र असलेल्या महिलांची संख्या मोठी असून, आकडेवारीनुसार भारतात जवळपास 45 कोटी महिला कर्जासाठी पात्र आहेत. त्यामु़ळे येत्या काही वर्षांत कर्जव्यवस्थेतील महिलांची आकडेवारी आणखीनच वाढण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.(Women Economic Empowerment in India)
महिलांच्या कर्जाची आकडेवारी...
- वर्ष 2017 ते 2025 मध्ये सक्रीय कर्जदार महिलांची वाढ 9 टक्के चक्रवाढ दराने
- वर्ष 2017 मध्ये महिलांमधील कर्जव्याप्ती 19 टक्के
- वर्ष 2025 मध्ये महिलांमधील कर्जव्याप्तीचे प्रमाण वाढून 36 टक्क्यांवर
- वर्ष 2017 मध्ये महिलांना झालेले कर्जवाटप 16 लाख कोटी
- वर्ष 2025 मध्ये महिलांना झालेले कर्जवाटप 76 लाख कोटी