Adv. Akash Fundkar : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची पडताळणी गरजेची

सर्वसमावेशक आराखडा तयार करा - मंत्री ॲड. आकाश फुंडकर

    08-Apr-2026   
Total Views |
Adv. Akash Fundkar
 
मुंबई : (Adv. Akash Fundkar) ऑनलाइन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी वर्कर्समार्फत ग्राहकांना सुरक्षित सेवा पुरविली जावी, यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कसून पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांनाही सेवा निर्दोष, सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत मिळावी, याकरिता सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर (Adv. Akash Fundkar) यांनी दिले.
 
मंत्रालयात आयोजित कामगार आणि गृह विभागाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट आदी विविध डिलिव्हरी व सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा पुरवीण्यासाठी डिलिव्हरी पार्टनर्स नियुक्त करतात. सध्या या कंपन्या त्यांची ऑनलाईन, फेसलेस पद्धतीने नोंदणी करून नंतर ही माहिती थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन एजन्सीकडे पाठवतात. मात्र, या एजन्सींना पडताळणीचे अधिकार कोणी व कोणत्या निकषांवर दिले, त्यांच्या प्रक्रियेला कायदेशीर आधार काय, याबाबत चर्चा करण्यात आली.(Adv. Akash Fundkar)
 
हेही वाचा : Ashok Kharat case: भोंदूबाबा खरातला कोर्टाचा झटका! आज न्यायालयीन कोठडी आणि उद्या पुन्हा..., सुनावणीत नेमकं काय घडलं?
 
मंत्री ॲड. आकाश फुंडकर (Adv. Akash Fundkar) म्हणाले की, "गिग व प्लॅटफॉर्म वर्कर्सची नोंदणी ज्या प्लॅटफॉर्मवर ‘पार्टनर’ म्हणून केली जाते, त्या कंपन्यांनीच या कामगारांच्या पार्श्वभूमी तपासाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे व्यवसायिक रजिस्ट्रेशन, चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, त्यांना पगार कसा व कोणत्या माध्यमातून दिला जातो, या सर्व बाबींचा संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा."(Adv. Akash Fundkar)
 
सायबर विभागाकडे नोंदणी आवश्यक
 
राज्यातील बहुतेक अ‍ॅग्रीगेटर कंपन्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे काम करत असून, त्या थेट कर्मचारी भरती न करता तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) संस्थांमार्फत गिग कामगारांची नियुक्ती करतात. त्यामुळे पारंपरिक नियोक्ता-कामगार संबंध निर्माण होत नाहीत आणि जबाबदाऱ्यांमध्ये अस्पष्टता राहते. गिग कामगारांची नियुक्ती प्रामुख्याने अ‍ॅप-आधारित प्रणालीद्वारे केली जाते. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक तपशील, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कागदपत्रे, विमा, ई-श्रम नोंदणी यांसह विविध कागदपत्रे आवश्यक ठरवली जातात. मात्र, या प्रक्रियेत एकसमान नियमावली गरजेची आहे. त्याचप्रमाणे सर्व गिग कामगारांची सायबर विभागाकडे नोंदणी, तसेच क्यूआर कोड असलेले ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्याबाबत आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सादर करणे अनिवार्य करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....