US-Iran War Ceasefire: ४० दिवसांनंतर अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम! इराणच्या १० कलमी प्रस्तावात कोणत्या अटी आहेत?

    08-Apr-2026   
Total Views |

US-Iran War Ceasefire
 
मुंबई : (US-Iran War Ceasefire) अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर अखेर दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा युद्धविराम दोन्ही बाजूंनी पाळला जाणार असून, या काळात दोन्ही देश कोणतीही आक्रमक कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. युद्धविराम जरी झाला असला तरी इराणने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले नाहीत. तर आपल्या अटींवर इराणने दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.(US-Iran War Ceasefire)

इराणने कोणत्या १० अटी घातल्या?

१. अहिंसेप्रती कटिबद्धता
२. होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम राहणार
३. युरेनियम संवर्धनास परवानगी
 
४. सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
 
५. सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
६. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
 
७. गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
८. इराणला नुकसानभरपाई देणे
 
९. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
 
१०. लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम
ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत आणि तेहरानसोबतची चर्चा निर्णायक टप्प्यावर आहे. इराणकडून मिळालेला १० मुद्द्यांचा प्रस्ताव चर्चेसाठी योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही युद्धविरामाची पुष्टी करत दोन आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र या काळात जहाजांची सुरक्षित वाहतूक सुरू राहील, मात्र त्यावर इराणी सैन्याची देखरेख असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हा युद्धविराम पश्चिम आशियातील आणि जागतिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.(US-Iran War Ceasefire)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\