मुंबई : (UBT)कोकणातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून उबाठा गटाला कोकणात खिंडार पडले आहे.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, अर्थराज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना सचिव संजय मोरे, पनवेल मनपा नगरसेवक प्रथमेश सोमण तसेच रत्नागिरी, रायगड आणि विदर्भातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.(UBT)
उबाठा गटाचे कोकणातील चिपळूणचे युवासेना विस्तारक, चिपळूण तालुकाप्रमुख उमेश खलाटे, उरणचे माजी जिल्हाप्रमुख विनोद साबळे आणि विदर्भातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील निलहोड नगर पंचायतीतील अपक्ष नगरसेवक सुरेंद्र गौतम यांच्यासह त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.(UBT)
यासोबतच चिपळूणमधून विजय शिर्के, ओंकार पंडित, दिप्ती सावंत देसाई, इकबाल बेबल, विराज खताते, समीर कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुराद चौगुले, वहाब बेबल, सुमित भुरण, दिप्ती भुरण आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. उरण मधून उपसरपंच अमर म्हात्रे, सुनंदा म्हात्रे, संकल्प घरत, नामदेव ठाकूर, अवधेश महतो, उत्तम चिकणे, समर्थ सोळंकी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा राजश्री कदम, उपाध्यक्षा बालिकाताई जाधव, असंख्य महिला आणि पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.(UBT)
तर विदर्भातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील तालुका संघटक गजेंद्र काकडे, तालुकाप्रमुख राजेंद्र गिरडकर, नरेश देवगडे, अनिकेत चित्तराम, नरेंद्र हटेले, वासुदेव चरडे, अक्षय कोलते यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.(UBT)