मुंबई :(TRAI)व्हॉईस आणि डेटा परफॉर्मन्सच्या प्रमुख निकषांमध्ये अन्य कंपन्यांना मात देत रिलायन्स जिओने मुंबईसह उपनगरीय दूरसंचार क्षेत्रात आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय ) यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये केलेल्या स्वतंत्र ड्राइव्ह टेस्ट (IDT) नुसार, जिओने सर्वाधिक 5G डाउनलोड स्पीड, सर्वात जलद 5G अपलोड स्पीड, सर्वोत्तम व्हॉईस कॉल गुणवत्ता आणि सर्वात कमी लेटन्सी प्रदान केली आहे. ट्राय चे निष्कर्ष जिओच्या प्रगत आणि भविष्योन्मुख मोबाईल नेटवर्कच्या बळावर सर्वोत्तम डिजिटल अनुभव देण्याचे आश्वासन यामुळे मिळते. (TRAI)
ट्राय च्या अहवालानुसार, जिओने सरासरी 244.43 Mbps असा 5G डाउनलोड स्पीड नोंदवला, ज्यात सर्व ऑपरेटर्समध्ये सर्वाधिक आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेगवान व्हिडिओ स्ट्रीमिंग, लॅग-फ्री ऑनलाइन गेमिंग, जलद अॅप डाउनलोड आणि पीक अवर्समध्येही अखंड ब्राउझिंग शक्य होते. तसेच, जिओने सरासरी 39.05 Mbps असा 5G अपलोड स्पीड नोंदवला—जो देखील सर्वाधिक आहे. हे वेग केवळ तांत्रिक प्राबल्यच दर्शवत नाहीत, तर ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनातून उत्तम कनेक्टिव्हिटी देण्याच्या जिओच्या भूमिकेची पुष्टी करतात, ज्यामुळे डिजिटल वापरकर्त्यांसाठी जिओ हा पसंतीचा नेटवर्क ठरतो.(TRAI)
जिओने कमी लेटन्सीमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, जी व्हिडिओ कॉल, व्हर्च्युअल मीटिंग्स आणि ऑनलाइन गेमिंगसाठी अत्यंत महत्त्वाची असते.(TRAI)
जलद डेटा पॅकेट डिलिव्हरीमुळे वापरकर्त्यांना अधिक स्मूथ आणि प्रतिसादक्षम अनुभव मिळतो, ज्यामुळे रिअल-टाइम संवादात विलंब अत्यल्प राहतो. डेटा सेवांसोबतच, व्हॉईस सेवांमध्येही जिओची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. IDT मध्ये उत्कृष्ट कॉल सेटअप यशदर, अतिशय जलद कॉल कनेक्शन वेळ, जवळपास शून्य कॉल ड्रॉप्स आणि स्पष्ट, उच्च-गुणवत्तेची आवाज गुणवत्ता अधोरेखित करण्यात आली आहे. यामुळे घरात, प्रवासात किंवा गर्दीच्या शहरी भागातही जिओ ग्राहकांना अखंड आणि विश्वासार्ह व्हॉईस कम्युनिकेशनचा अनुभव मिळतो.(TRAI)
या ड्राइव्ह टेस्टमध्ये रेतीबंदर, मुंब्रा, कळेसकर, दहिसर मोरी, नावडे, तळोजा, देविचपाडा, उस्ताणे, तळोजा बायपास फाटा, भावदेवी नगर, शिळ फाटा खाडी, महापे, कोपर खैराणे, वाशी प्लाझा, बहनानी चौक, तुर्भे एमआयडीसी , एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, घनसोली, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, रबाळे, ऐरोली, दिघा गाव, कळवा वेस्ट आणि वास्तू आनंद यांसारख्या उच्च घनतेच्या भागांचा समावेश होता. जिओच्या सशक्त आणि सुयोग्य नेटवर्क आर्किटेक्चरमुळे सर्व क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाची कामगिरी दिसून आली, जी कठीण परिस्थितीतही सातत्यपूर्ण गुणवत्तेची हमी देते.(TRAI)
ट्राय ने ऐरोली पोलिस स्टेशन, कळवा तहसीलदार कार्यालय, मिलेनियम बिझनेस पार्क (MBP), मुंब्रा महानगरपालिका रुग्णालय, NMMC वॉर्ड ऑफिस कोपर खैराणे, पावणे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र आणि रबाळे एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्र (मुख्य प्रवेशद्वार) येथेही प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यमापन केले. 21 जानेवारी 2026 रोजी ऐरोली, कोपर खैराणे आणि रबाळे रेल्वे स्थानकांवर वॉक टेस्ट घेण्यात आली, ज्यातून गर्दीच्या पादचारी परिसरातील नेटवर्क कामगिरीचे निरीक्षण करण्यात आले. तसेच, अटल सेतू आणि बेलापूर जेट्टी या किनारी मार्गांवर ड्राइव्ह टेस्ट करून सेवा गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला. बफर-फ्री स्ट्रीमिंग, एचडी व्हॉईस कॉल्स, रिअल-टाइम गेमिंग आणि डिजिटल सहकार्यासाठी रिलायन्स जिओ मुंबई आणि उपनगरांमध्ये मोबाईल वापरकर्त्यांची पहिली पसंती ठरत आहे. भविष्योन्मुख पायाभूत सुविधा आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पनांच्या जोरावर, जिओ केवळ भारताच्या डिजिटल प्रगतीसोबत चालत नाही, तर त्या प्रगतीला गती देत आहे.(TRAI)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.