Thane–Borivali Twin Tunnel Project : ठाणे–बोरिवली ट्विन टनेल प्रकल्प : ‘नायक’ पाठोपाठ अर्जुना टीबीएमचे काम सुरु होणार

    08-Apr-2026
Total Views |
Thane–Borivali Twin Tunnel Project
 
मुंबई : (Thane–Borivali Twin Tunnel Project) मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने नुकतेच ठाणे–बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी ‘नायक’ हे अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन कार्यान्वित केले. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मेघाचे एमडी कृष्णा रेड्डी आणि एमएमआरडीएचे डॉ. संजय मुखर्जी तसेच अनेक वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.(Thane–Borivali Twin Tunnel Project)
 
११.८४ किमी लांबीच्या या प्रकल्पात १०.२५ किमी दुहेरी बोगदा व १.५९ किमीचे जोड रस्ते समावेश आहे. पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातील घोडबंदर रोड व बोरिवली जवळच्या पश्चिम द्रुतगती मार्गाला थेट भूमिगत जोडणी मिळणार असून प्रवास वेळ ६० ते ९० मिनिटांवरून फक्त १५ मिनिटांवर येणार आहे. संपूर्ण प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असल्याने त्याचा कोणताही विपरीत परिणाम जैवविविधतेवर होणार नाही. या प्रकल्पामुळे प्रदूषणामध्ये घट होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी घेण्यात आली आहे. भरपाई वृक्षारोपणाचा भाग म्हणून ११ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.(Thane–Borivali Twin Tunnel Project)
 
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
 
• भारतातील सर्वात मोठ्या हार्ड रॉक टीबीएमपैकी एक
 
• वाहतूक व्यवस्था: प्रत्येक बोगद्यात २ वाहतूक लेन + १ आपत्कालीन लेन
 
• सुरक्षा: दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेज, यांत्रिक वायुवीजन, अग्निशमन व धूर शोध यंत्रणा, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार LED व रेट्रो
 
रिफ्लेक्टिव्ह साइनेज
 
• टीबीएम वैशिष्ट्ये: १३.३४ मीटर व्यासाचे, ८६ मीटर लांबीचे, सुमारे २५०० टन वजनाचे हार्ड रॉक टनेल जर्मन बोरिंग मशीन मुंबईत वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या कटरहेड्सपैकी एक आहे. हे यंत्र ”सिंगल-शील्ड, ओपन-टाइप” रचनेचा वापर करून चालते. कठीण खडकाळ परिस्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे काम बजावते.
 
• कमाल खोली: सुमारे २३ मीटर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली पर्यावरणपूरक बांधकाम
 
प्रकल्पाचे महत्त्व
 
• दररोज सुमारे ८०,००० वाहनांची वाहतूक (२०२९ पर्यंतचा अंदाज)
  
• वाहतूक कोंडी कमी होऊन प्रदूषण व ध्वनीप्रदूषणात घट
 
• शाश्वत व एकात्मिक शहरी विकासाला चालना