Sunetra Pawar Meets CM Fadnavis : सुनेत्रा पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    08-Apr-2026   
Total Views |
Sunetra Pawar Meets CM Fadnavis
 
मुंबई : (Sunetra Pawar Meets CM Fadnavis) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमागचे कारण पुढे आले नसले तरी, बारामती पोटनिवडणूकीसंदर्भात ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.(Sunetra Pawar Meets CM Fadnavis)
 
सुनेत्रा पवार या सकाळी ११ च्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफदेखील उपस्थित होते. जवळपास एक तास ही बैठक झाली असून या भेटीत बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.(Sunetra Pawar Meets CM Fadnavis)
 
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल. भाजप मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन दिल्याचीही माहिती पुढे आली आहे.(Sunetra Pawar Meets CM Fadnavis)
 
...तर उमेदवारी मागे घेणार - काँग्रेस
 
दरम्यान, बारामती पोटनिवडणूकीसाठी ५० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी महाराष्ट्रात अजित पवार यांच्या अपघाताबद्दल एफआयआर दाखल केल्यास उमेदवारी मागे घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता कोण कोण अर्ज माघारी घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Sunetra Pawar Meets CM Fadnavis)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....