मुंबई : (Mission Lakshyavedh) महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना जागतिक स्तरावर चमकण्याची संधी मिळावी आणि ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करता यावी, या उद्देशाने राज्य शासनाने 'मिशन लक्ष्यवेध' (Mission Lakshyavedh) ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई विभागीय निवड चाचणी (शूटिंग) कामगार कल्याण क्रीडा मंडळ, प्रभादेवी इथे बुधवारपासून सुरू झाली आहे.(Mission Lakshyavedh)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत याबद्दलची घोषणा केली होती. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, विभागीय उपसंचालक कार्यालय, मुंबई विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या योजनेअंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक क्रीडा साहित्य आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे सहकार्य लाभणार आहे. राज्याचे क्रीडा टॅलेंट ओळखून त्यांना 'हाय परफॉर्मन्स सेंटर'च्या माध्यमातून ऑलिंपिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धांसाठी तयार करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.(Mission Lakshyavedh)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....